“१५० इंजेक्शन्स, शारिरिक वेदना…”, लोकप्रिय अभिनेत्रीने सांगितला IVFचा खडतर प्रवास
आई होण्याचा निर्णय आणि त्यातील आव्हानांवर अभिनेत्री अनुष्का रंजनने तिचा अनुभव शेअर केला आहे. नैसर्गिकरित्या आई होण्यात अडचणी आल्याने तिने IVF उपचारांचा पर्याय निवडला. या प्रक्रियेत तिला १५० इंजेक्शन्स घ्यावी लागली, ज्यामुळे तीला शारीरिक आणि मानसिक वेदना सहन कराव्या लागल्या. अनुष्काने IVF प्रक्रियेतील गैरसमज दूर करण्याचे आवाहन केले आणि कुटुंबाच्या पाठिंब्यामुळे तिला बळ मिळाल्याचे सांगितले.