लहानपणापासूनच गायनाची आवड, आईकडून घेतले धडे; अरिजीत सिंगचं शिक्षण किती? जाणून घ्या…
बॉलीवूडचा लोकप्रिय गायक अरिजीत सिंगने नुकतीच पार्श्वगायनातून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. अरिजीतचं संगीताशी लहानपणापासूनच घट्ट नातं होतं. त्याने शालेय शिक्षण राजा बिजय सिंग हायस्कूल आणि पदवीचं शिक्षण श्रीपत सिंग कॉलेजमधून घेतलं. २००५ साली ‘गुरुकुल’ रिअॅलिटी शोमधून त्याच्या करिअरची सुरुवात झाली. ‘मर्डर २’ आणि ‘आशिकी २’मधील गाण्यांनी त्याला प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली.