सैफ अली खानवर हल्ला कसा केला? आरोपी पोलिसांना म्हणाला, त्याने समोरून घट्ट पकडलं अन्…
सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या शरीफुल इस्लाम शेहजाद मोहम्मद रोहिल्ला अमीन फकीर उर्फ विजय दासला रविवारी अटक करण्यात आली. चोरीच्या उद्देशाने सैफच्या घरात घुसलेल्या आरोपीने सैफच्या पाठीवर चाकूने वार केले होते. हल्ल्यानंतर आरोपी दोन तास इमारतीच्या बागेत लपून बसला होता. सैफला लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले, जिथे त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. आरोपीला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.