“एक वर्ष मेंदी अन्…”, अभिनेत्री भाग्यश्रीने सांगितला लग्नाचा रंजक किस्सा; म्हणाली…
हॉटरफ्लाय दिलेल्या मुलाखतीमध्ये भाग्यश्रीने तिच्या लग्नाच्या काळातील किस्सा शेअर केला आहे. ती म्हणाली, "लग्नानंतर एक वर्ष मी माझ्या हातावरची मेंदी उतरू दिली नाही. जर मेंदीचा रंग कमी होत गेला, तर मी लगेच मेंदी काढणाऱ्यांना बोलावून मेंदी काढून घेत असे. तसेच जर मेंदीवाली नसेल तर मी स्वतः मेंदीची वाटी घेऊन बसत असे आणि टूथपिकने स्वतःच्या हातावर मेंदी काढत असे, त्यामुळे लग्नानंतर एक वर्षभर माझ्या हातावरची मेंदी उतरली नाही."