चेतक स्क्रीन अवॉर्ड्स २०२६ : धर्मेंद्र यांना मरणोत्तर ‘जीवनगौरव’ प्रदान; बॉबी देओल भावुक
मुंबईत रविवारी पार पडलेल्या 'चेतक स्क्रीन अवॉर्ड्स २०२६' मध्ये धर्मेंद्र यांना मरणोत्तर जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. बॉबी देओलने वडिलांच्या वतीने पुरस्कार स्वीकारताना भावुक होऊन त्यांचे स्मरण केले. जावेद अख्तर यांनी धर्मेंद्र यांच्याबरोबरच्या आठवणींना उजाळा दिला. धर्मेंद्र यांनी ३०० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले असून, गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये त्यांचे निधन झाले.