“VFX अन् AI मुळे…”, अॅक्शन चित्रपटांबाबत अक्षय कुमारने व्यक्त केली नाराजी, म्हणाला…
बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमारने अॅक्शन सीनसाठी व्हीएफएक्स आणि एआयच्या वापरावर नाराजी व्यक्त केली आहे. त्याला प्रत्यक्ष स्टंट्स करायला आवडतात आणि त्याने वास्तववादी अॅक्शन चित्रपटांची इच्छा व्यक्त केली आहे. अक्षयने 'खिलाडी', 'मोहरा', 'सूर्यवंशी' यांसारख्या चित्रपटांतून आपली ओळख निर्माण केली. सध्या तो 'गोलमाल ५' आणि 'भूत बंगला' या आगामी चित्रपटांमध्ये व्यग्र आहे.