पैसे देऊन अंत्यसंस्काराला बोलावलं, रडल्यास मानधन वाढवून देण्याची कुटुंबाची ऑफर अन्…
बॉलीवूड अभिनेता चंकी पांडेने 'द ग्रेट इंडियन कपिल शो'मध्ये एक मजेशीर किस्सा सांगितला. त्याला एका कुटुंबाने अंत्यसंस्काराला येण्यासाठी पैसे दिले होते. चंकीने सांगितले की, त्याला कोणत्याही कार्यक्रमासाठी बोलावलं की तो लगेच जायचा. एकदा आयोजकाने पांढरे कपडे घालून यायला सांगितले आणि चंकी अंत्यसंस्काराला पोहोचला. कुटुंबाने त्याला रडल्यास जास्त पैसे देण्याचे आश्वासन दिले होते. हा किस्सा ऐकून सर्वजण हसू लागले.