“दारूचे ग्लास घेऊन…”, लग्नात डान्स करणाऱ्यांबद्दल रणबीर कपूर म्हणालेला असं काही की…
उदयपूरमध्ये झालेल्या नेत्रा मंटेना यांच्या भव्य लग्नसोहळ्यात रणवीर सिंहने धमाल परफॉर्मन्स दिला. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे पुत्र डोनाल्ड ट्रम्प ज्युनियर यांनीही रणवीरसह डान्स केला. या पार्श्वभूमीवर रणबीर कपूरच्या २०११ मधील मुलाखतीची चर्चा होत आहे, ज्यात त्याने पैशांसाठी लग्नात डान्स न करण्याचे स्पष्ट केले होते. रणबीरने आपल्या कुटुंबाच्या मूल्यांमुळे असे काम न करण्याचे ठरवले आहे.