“अजूनही वाट पाहत आहे”, ‘हिरामंडी’च्या यशानंतरही अभिनेत्री कामाच्या शोधात; म्हणाली…
बॉलीवूड अभिनेत्री अदिती राव हैदरीने 'हिरामंडी' या गाजलेल्या सीरिजमध्ये दमदार भूमिका साकारली होती. या सीरिजला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळूनही अदितीला यानंतर काम मिळालेलं नाही. लिली सिंग यांच्याशी संवाद साधताना तिने 'हिरामंडी'नंतर कोणतीही ऑफर न आल्याचे सांगितले. दरम्यान, अदिती राव हैदरी सोशल मीडियावर सक्रिय असते. काही दिवसांपुर्वी तिने शेअर केलेल्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमधील पारंपरिक लूकमधील फोटोची चर्चा झाली होती.