रोज दीड तास व्यायाम, दुपारनंतर जेवण नाहीच…; ७८व्या वर्षी मुमताज स्वत:ला ‘असं’ ठेवतात फिट
ज्येष्ठ अभिनेत्री मुमताज यांनी ६०-७० च्या दशकात आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. वयाच्या पंचाहत्तरीतही त्या फिट आहेत. मुमताज यांनी आपल्या फिटनेसचे गुपित सांगितले आहे. त्या संध्याकाळी काहीही खात नाहीत आणि दुपारी ४ नंतर फक्त फळ खातात. दररोज ९० मिनिटे व्यायाम करतात. फिटनेस म्हणजे शिस्त असल्याचे त्यांनी सांगितले. देव आनंद आणि अक्षय कुमारने दिलेल्या सल्ल्याचे त्या पालन करतात.