Cannes मध्ये उर्वशी रौतेलाने उसवलेला ड्रेस का घातलेला? अभिनेत्रीने स्वत:चं सांगितलं सत्य,
'कान्स २०२५' मध्ये बॉलीवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला रेड कार्पेटवर काळ्या सिल्क गाऊनमध्ये दिसली. तिचा ड्रेस काखेत उसवला होता, ज्यामुळे नेटकऱ्यांनी तिच्यावर टीका केली. याबद्दल उर्वशीने खुलासा केला आहे की, वृद्ध महिलेला वाचवताना तिच्याबरोबर झालेल्या प्रसंगात तिचा ड्रेस काखेत उसवला. तसंच यावरून तिने ट्रोल करणाऱ्यांना उत्तर देत सौंदर्य कपड्यांमध्ये नसून निर्णयांमध्ये असतं असं म्हटलं. दरम्यान, उर्वशी लवकरच 'वेलकम टू द जंगल' चित्रपटात दिसणार आहे.