‘धुरंधर २’मधील भूमिकेसाठी राकेश बेदी नव्हते पहिली पसंती; कास्टिंग डायरेक्टर म्हणाला…
'धुरंधर २' हा चित्रपट १९ मार्च रोजी प्रदर्शित झाला असून बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई करत आहे. रणवीर सिंह, आर. माधवन, अर्जुन रामपाल, संजय दत्त, दानिश पांडोर आणि सारा अर्जुन यांच्या अभिनयाचे प्रेक्षक कौतुक करत आहेत. विशेष म्हणजे, राकेश बेदी यांनी साकारलेली जमील जमाली ही भूमिका चर्चेत आहे. कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाबरा यांनी सांगितले की, ही भूमिका आधी इतर २-३ अभिनेत्यांना विचारली होती, पण शेवटी राकेश बेदी यांना दिली गेली. 'धुरंधर २' हा २०२५ मध्ये आलेल्या 'धुरंधर'चा दुसरा भाग आहे आणि प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे.