Chhaava Box Office Collection Day 1
1 / 31

Chhaava : ‘छावा’ची ग्रँड ओपनिंग! विकी कौशलच्या सिनेमाने पहिल्या दिवशी कमावले तब्बल…

बॉलीवूड February 15, 2025

लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित 'छावा' चित्रपट, छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्यगाथेवर आधारित, अखेर प्रदर्शित झाला आहे. विकी कौशल, रश्मिका मंदाना आणि अक्षय खन्ना यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाने प्रेक्षकांना भारावून टाकले आहे. पहिल्या दिवशी 'छावा'ने ३१ कोटी रुपयांची कमाई केली आहे. चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत असून सोशल मीडियावरही कौतुक होत आहे.

Swipe up for next shorts
Amritsar temple grenade attack
2 / 31

अमृतसरमधील मंदिरावर ग्रेनेड हल्ला करणाऱ्या आरोपीचा पोलिसांकडून एन्काऊंटर

पंजाबच्या अमृतसरमधील खांडवाला येथे ठाकुरद्वारा मंदिराबाहेर तीन दिवसांपूर्वी ग्रेनेड हल्ला झाला होता. दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी ग्रेनेड फेकून पळ काढला. सोमवारी पोलिसांनी एका हल्लेखोराला चकमकीत ठार केले, तर दुसरा फरार आहे.

Swipe up for next shorts
Ajit Pawar and Devendra Fadnavis
3 / 31

“तुमचा रात्रीशी संबंध नाही”, फडणवीस आणि पवारांच्या संवादामुळे सभागृहात पिकला हशा

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत अर्थसंकल्पावरील चर्चेला उत्तर देताना कृषी क्षेत्रातील एआय तंत्रज्ञानाच्या वापरामुळे उत्पादन वाढणार असल्याचे सांगितले. उसाच्या उत्पादनाचे उदाहरण देत असताना, अजित पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात मिश्किल संवाद झाला. पवारांनी उसाचे टनेज १०० च्या पुढे गेल्याचे सांगितले, त्यावर फडणवीसांनी "तुमचा रात्रीशी संबंध नाही" असे मिश्किलपणे म्हटले, ज्यामुळे सभागृहात हशा पिकला.

Swipe up for next shorts
Ajit Pawar Budget session
4 / 31

“ऐकल्या शिव्या दुनियेच्या, जाहली बदनामी…”, अजित पवारांची विरोधकांवर मिश्किल टोलेबाजी!

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत अर्थसंकल्पावरील चर्चेला उत्तर दिले. त्यांनी सत्ताधारी आणि विरोधकांचे आभार मानले व काव्यांजली सादर करत विरोधकांवर निशाणा साधला. पवार म्हणाले की, अर्थसंकल्पावर विविध प्रतिक्रिया आल्या असून, विरोधकांची टीका नेहमीचीच आहे. त्यांनी मंत्र्यांनी शरण जाण्याच्या वक्तव्यावर टीका केली आणि सरकारमध्ये एकी असल्याचे सांगितले. पवारांनी काव्याच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त केल्या.

Rakshit Chaursaiya
5 / 31

भरधाव कारने महिलेला चिरडलेल्या तरुणाच्या रक्तात अंमली पदार्थांचे अंश

वडोदरा येथे भरधाव वाहन चालवून तीन वाहनांना धडक देऊन एका महिलेच्या मृत्यूसाठी कारणीभूत ठरलेल्या रक्षित चौरसियाच्या रक्तात ड्रग्स सापडल्याचे पोलिसांनी सांगितले. चौरसियाने फोक्सवॅगन व्हर्टस गाडी चालवत तीन दुचाकींना धडक दिली, ज्यामुळे हेमाली पटेल यांचा मृत्यू झाला आणि अनेक जण जखमी झाले. चौरसियाचा पूर्वइतिहास असून, मागील महिन्यातही त्याने गुन्हा केला होता. आता त्याच्यावर सदोष मनुष्यवधाचा खटला दाखल करण्यात आला आहे.

Aashram Season 3 PT 2 pammi pehalwan bhopa swami intimate scenes
6 / 31

‘आश्रम 3’मध्ये मराठमोळ्या अदितीसोबतच्या इंटिमेट सीनबद्दल भोपा स्वामी म्हणाला, “मी…”

प्रकाश झा यांच्या 'आश्रम' वेब सीरिजचा तिसरा सीझन एमएक्स प्लेयरवर रिलीज झाला आहे. बॉबी देओलने बाबा निरालाच्या भूमिकेत लक्ष वेधले, तर पम्मी पहेलवान (अदिती पोहनकर) आणि भोपा स्वामी (चंदन रॉय सान्याल) यांच्या इंटिमेट सीनची चर्चा आहे. चंदनने अदितीबरोबरच्या सीनबद्दल सकारात्मक प्रतिक्रिया दिली. या सीरिजमुळे अदिती पोहनकरला खूप लोकप्रियता मिळाली असून आगामी सीझनची चाहत्यांना उत्सुकता आहे.

Numerology Prediction
7 / 31

Numerology : या ४ तारखेला जन्मलेल्या मुली असतात अत्यंत भावूक, जोडीदाराला कायम समजून घेतात

Numerology Prediction: वैदिक ज्योतिषशास्त्राप्रमाणे, कोणत्याही व्यक्तीची कुंडली पाहून, त्याच्या स्वभावाचा, वर्तनाचा आणि भविष्याचा अंदाज घेता येतो. त्याचप्रमाणे, अंकशास्त्रात, एखाद्या व्यक्तीचा स्वभाव, व्यक्तिमत्व आणि नशीब त्याच्या/तिच्या मूलांकवरून ठरवता येते. अशा परिस्थितीत, अशा मुलींबद्दल जाणून घेऊ ज्या स्वभावाने खूप भावनिक असतात. या मुली आपल्या जोडीदाराशी खूप चांगल्या प्रकारे समजून घेतात. ते खूप लवचिक आणि निष्पाप असतात.

Yo Yo Honey Singh Talking Marathi language and sang dada kondke popular song video viral
8 / 31

Video: “ढगाला लागली कळ…”, हनी सिंगच्या आवाजात दादा कोंडकेंचं लोकप्रिय गाणं ऐकलंत का?

प्रसिद्ध रॅपर हनी सिंगने ( Honey Singh ) आपल्या दमदार आवाजाने श्रोत्यांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलं आहे. त्याचा प्रत्येक रॅप, गाणं सुपरहिट होतं असतं. हनी सिंग त्याच्या रॅप, गाण्यांमुळे जितका चर्चेत असतो. तितकाच तो त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असतो. सध्या हनी सिंगचा सोशल मीडियावर एक व्हिडीओ खूप व्हायरल होतं आहे. ज्यामध्ये हनी सिंग मराठीत संवाद साधताना दिसत आहे. एवढंच नाहीतर त्याने दादा कोंडकेंच्या लोकप्रिय गाण्यांचा दोन ओळी गायल्या आहेत. हनी सिंगचा या व्हिडीओने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

Maruti Suzukis price hikes
9 / 31

Maruti Suzuki : ग्राहकांना मोठा फटका! मारूती सुझुकीच्या कार्स एवढ्या टक्क्यांनी महागणार

ऑटो 2 hr ago

Maruti Suzuki's price hikes : दिवसेंदिवस मारुती सुझुकीच्या वाहनांची चांगलीच मागणी वाढत आहे. अशात सोमवारी मारुती सुझुकी कंपनीने एप्रिल महिन्यापासून वाहनांच्या किमती वाढवत असल्याचे जाहीर केले आहे.

If you do not use smartphones for 3 days what will happen to your brain know from expert
10 / 31

जर तुम्ही तीन दिवस फोन वापरला नाही, तर मेंदूवर काय परिणाम होईल? तज्ज्ञ सांगतात…

स्मार्टफोनच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे त्याचा वापर खूपच मोठ्या प्रमाणात वाढला आहे. गेल्या काही दशकांमध्ये स्मार्टफोनच्या या अतिवापरामुळे होणाऱ्या विपरीत अशा शारीरिक, सामाजिक व मानसिक परिणामांवर चर्चा केली जात आहे. पण, तुम्ही कधी विचार केला आहे का, जर तुम्ही काही दिवस स्मार्टफोन वापरणे थांबवले, तर काय होईल? ‘कॉम्प्युटर्स इन ह्युमन बिहेवियर’ या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या एका नवीन अभ्यासातून स्मार्टफोन वापरणाऱ्या २५ तरुणांवर ७२ तास स्मार्टफोन वापरण्यावर बंदी घालण्याचे परिणाम तपासण्यात आले.

Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti 2025 wishes in marathi
11 / 31

शिवजयंतीनिमित्त शिवप्रेमी, प्रियजनांना पाठवा खास शुभेच्छा, पाहा एकापेक्षा एक सुंदर मेसेज

Shiv Jaynati 2025 Wishes In Marathi : दरवर्षी १७ मार्च रोजी मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीनुसार जयंती साजरी केली जाते. त्यानिमित्ताने देशभरात मोठ्या उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. चला तर मग छत्रपती शिवाजी महाराजांच्या तिथीनुसार असलेल्या जयंतीनिमित्त प्रत्येक शिवप्रेमीला, मित्रपरिवाराला खास शुभेच्छा पाठवूया आणि शिवरायांना अभिवादन करूया…

chhatrapati shivaji maharaj temple bhiwandi
12 / 31

Video: छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराचं भिवंडीत लोकार्पण; कसं आहे हे मंदिर?

भिवंडीत छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त पहिल्या शिव मंदिराचं उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडलं. या मंदिरात शिवाजी महाराजांची साडेसहा फूट उंचीची मूर्ती प्रसिद्ध शिल्पकार अरुण योगीराज यांनी घडवली आहे. किल्ल्याच्या रचनेप्रमाणे उभारलेल्या या मंदिरासाठी ७-८ कोटी रुपये खर्च झाले असून, मंदिराभोवती तटबंदी, बुरूज आणि महाद्वार आहे. मंदिराच्या खांबांवर कोरीव नक्षीकाम आहे.

Lakshmi Niwas fame Meenakshi rathod husband kailash Waghmare share special post for her birthday
13 / 31

‘लक्ष्मी निवास’ फेम मीनाक्षी राठोडसाठी नवऱ्याने शेअर केली खास पोस्ट, म्हणाला…

‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘लक्ष्मी निवास’ मालिकेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या मालिकेने अल्पावधीतचं प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. मोठी स्टारकास्ट असणारी ही मालिका सध्या प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. या मालिकेतील प्रत्येक पात्र आता घराघरात पोहोचलं आहे. आज ‘लक्ष्मी निवास’ मालिकेतील वीणा म्हणजे अभिनेत्री मीनाक्षी राठोडचा वाढदिवस आहे. यानिमित्ताने तिच्या नवऱ्याने सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर केली आहे.

Sonu bhide aka Jheel Mehta Registered Marriage In Court
14 / 31

‘तारक मेहता..’ फेम ‘सोनू’ने दीड महिन्यात दुसऱ्यांदा केलं लग्न; व्हिडीओ शेअर करत म्हणाली…

'तारक मेहता का उल्टा चश्मा' मालिकेत सोनूची भूमिका साकारणारी झील मेहता सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. झीलने तिच्या इन्स्टाग्रामवर नोंदणी पद्धतीने लग्नाचा व्हिडीओ शेअर केला आहे. झीलने २८ डिसेंबर २०२४ रोजी आदित्य दुबेबरोबर हिंदू रितीरिवाजानुसार लग्न केले होते. आता त्यांनी १७ फेब्रुवारी २०२५ रोजी नोंदणी पद्धतीने लग्न केले. झीलने अभिनय सोडून व्यवसायात पाऊल ठेवले आहे.

AR Rahman wife Saira Banu says they not officially divorced
15 / 31

“आमचा घटस्फोट झालेला नाही”, विभक्त होण्याच्या घोषणेनंतर एआर रहमान यांच्या पत्नीचा खुलासा

ऑस्कर विजेते संगीतकार ए आर रहमान यांना डिहायड्रेशनमुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र आता त्यांची प्रकृती सुधारली आहे. त्यांच्या पत्नी सायरा बानो यांनी व्हॉइस नोटद्वारे सांगितले की, रहमान यांची अँजिओग्राफी करण्यात आली असून ते ठीक आहेत. सायराने स्पष्ट केले की त्यांचा घटस्फोट झालेला नाही आणि ते अजूनही पती-पत्नी आहेत. रहमान रमजानच्या उपवासामुळे डिहायड्रेशन झाले असावे.

raj thackeray shiv jayanti 2025
16 / 31

“..त्यामुळे झटपट यशासाठी मला शॉर्टकट घ्यावासा वाटत नाही”, राज ठाकरेंची भूमिका!

शिवजयंती तारखेनुसार साजरी करावी की तिथीनुसार, यावर अद्याप ठाम उत्तर नाही. त्यामुळे शिवप्रेमींना दोन दिवशी जयंती साजरी करण्याची संधी मिळते. राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर शिवजयंतीच्या निमित्ताने भावना व्यक्त केल्या. त्यांनी प्रबोधनकार ठाकरे यांचे विचार नमूद केले आणि शिवचरित्राच्या प्रभावामुळे नैराश्य येत नसल्याचे सांगितले. शिवचरित्राने त्यांना महाराष्ट्र घडवण्याचे ध्येय दिले आहे.

PM Modi explains fasting to Lex Fridman
17 / 31

“४५ तासांचा उपवास, फक्त पाणी प्यायलो”; फ्रिडमन यांनी नेमकं काय सांगितलं?

अमेरिकेतील कृत्रिम बुद्धिमत्ता अभियंता आणि पॉडकास्टर लेक्स फ्रिडमन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तीन तासांची मुलाखत घेतली. मोदींनी बालपण, हिमालयातील अनुभव, संघाचे स्थान, पाकिस्तान-ट्रम्प संबंध यावर चर्चा केली. लेक्स फ्रिडमन यांनी या मुलाखतीसाठी दोन दिवस उपवास धरला होता. मोदींनी उपवासाच्या आध्यात्मिक आणि जीवनशैलीतील महत्त्वावर भाष्य केले. उपवासामुळे इंद्रिये तीक्ष्ण होतात आणि जीवनाला आकार मिळतो, असे मोदी म्हणाले.

say jai shivray instead of hello ncp sharad pawar
18 / 31

‘फोनवर आता ‘हॅलो’ नाही, तर ‘जय शिवराय’ बोला’, राष्ट्रवादीच्या (शरद पवार) नेत्याचा सल्ला

महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासावर राजकीय चर्चा सुरू असताना, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाने 'जय शिवराय' ही घोषणा सुरू केली आहे. आमदार शशिकांत शिंदे यांनी सांगलीतील मेळाव्यात कार्यकर्त्यांना फोनवर 'हॅलो' ऐवजी 'जय शिवराय' म्हणण्याचे आवाहन केले.

Who is Rutuja Patil ?
19 / 31

अजित पवारांची होणारी सून आणि जय यांची होणारी पत्नी ऋतुजा पाटील कोण आहे?

अजित पवार यांचे पुत्र जय पवार आणि ऋतुजा पाटील यांचा साखरपुडा १० किंवा ११ एप्रिल रोजी होणार आहे. ऋतुजा पाटील या फलटण येथील प्रवीण पाटील यांच्या कन्या असून उच्चशिक्षित आहेत. जय आणि ऋतुजा यांची ओळख काही वर्षांपासून आहे. जय पवार यांनी शरद पवार आणि प्रतिभा पवार यांची भेट घेतली, ज्याचे फोटो सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियावर शेअर केले.

Bareilly Maulana angry on Mohammed Shami daughter
20 / 31

‘होळी खेळणे गुन्हा’, रमजानच्या टीकेनंतर मौलानाकडून आता मोहम्मद शमीची मुलगी लक्ष्य

भारतीय क्रिकेटपटू मोहम्मद शमीवर रमजानच्या महिन्यात उपवास न केल्याबद्दल मौलाना शाहबुद्दीन रझवी यांनी टीका केली होती. आता त्यांनी शमीच्या मुलीवर होळी खेळल्याबद्दल टीका केली आहे. रझवी म्हणाले की, मुलगी अजाणतेपणी होळी खेळली असेल तर गुन्हा नाही, पण जाणूनबुजून खेळली असेल तर शरीयत नुसार गुन्हा आहे. त्यांनी शमीला इस्लामच्या तत्त्वांचे पालन करण्याचा सल्ला दिला आहे.

Vadodara Car Crash Accused Rakshit Chaurasia
21 / 31

भरधाव कारने महिलेला चिरडणाऱ्या आरोपीने मागच्या महिन्यातही केला होता गुन्हा

वडोदरा येथे भरधाव वाहन चालवून तीन वाहनांना धडक देऊन एका महिलेच्या मृत्यूसाठी कारणीभूत ठरलेल्या रक्षित चौरसियाचा आणखी प्रताप समोर आला आहे. मागील महिन्यात पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले होते, मात्र दिलगिरी व्यक्त केल्यानंतर सोडून दिले होते.

kamal khera and anita Anand Canada
22 / 31

कॅनडाच्या मंत्रिमंडळात समावेश केलेल्या ‘त्या’ दोन भारतीय महिला खासदार कोण?

कॅनडाचे नवीन पंतप्रधान मार्क कार्नी यांच्या मंत्रिमंडळात भारतीय वंशाच्या खासदार अनिता आनंद आणि कमल खेरा यांना मंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. अनिता आनंद या नाविन्यता, विज्ञान आणि उद्योग मंत्री तर कमल खेरा या आरोग्य मंत्रीपदी नियुक्त झाल्या आहेत. कमल खेरा या कॅनडाच्या संसदेत निवडून येणाऱ्या सर्वात तरुण महिलांपैकी एक असून, अनिता आनंद या वकील आणि संशोधक आहेत.

Politics on Aurangzeb Tomb
23 / 31

“औरंगजेबाची कबर उखडून टाका”; या मागणीनंतर महाराष्ट्रात राजकारण कसं रंगलं आहे?

१४ फेब्रुवारीला प्रदर्शित झालेल्या "छावा" चित्रपटानंतर औरंगजेब चर्चेत आला. भाजपा खासदार उदयनराजे भोसले यांनी औरंगजेबाची कबर उखडण्याची मागणी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कायद्याचे पालन करण्याचे आवाहन केले. शिवसेना, विश्व हिंदू परिषद, आणि काँग्रेस नेत्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी या वादावर टीका केली. मागच्या नऊ दिवसांत या सगळ्या घडामोडी घडल्या आहेत.

Sanjay Raut
24 / 31

“कालपर्यंत संघ, सावरकरांना शिव्या देणारे आज…”, संजय राऊतांची भाजपाच्या नेत्यावर टीका

शिवसेना (ठाकरे) नेते संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, १९४७ पूर्वीची परिस्थिती आणि आजची परिस्थिती यात फारसा फरक नाही. संघ परिवाराचे नियंत्रण सुटले असून ते दंगली घडविणे, मशिदीवर हल्ले करणे यासारखी कृत्ये करत आहेत. महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या असताना, सरकार हलाल आणि झटका मटण यावर वातावरण दुषित करत आहे.

Congress offer CM post to Shinde-Ajit Pawar
25 / 31

महायुतीत वाद; काँग्रेसची एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपदाची ऑफर, संजय राऊत यांचाही प्रस्ताव

काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना आळीपाळीने मुख्यमंत्रीपदाचा प्रस्ताव दिला आहे. महायुतीमध्ये या नेत्यांची घुसमट होत असल्याचे पटोले म्हणाले. त्यांच्या विधानाला महाविकास आघाडीतील नेत्यांनी पाठिंबा दिला. विजय वडेट्टीवार यांनी शिंदे यांचे कौतुक केले, तर संजय राऊत यांनी राजकारणात सर्व काही शक्य असल्याचे म्हटले.

US attack on Houthis
26 / 31

डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशानंतर येमेनच्या हुथी बंडखोरांवर अमेरिकेचा एअरस्ट्राईक

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लाल समुद्रातील जहाजांवर हुथी बंडखोरांनी केलेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर देत लष्करी कारवाई केली. या एअरस्ट्राईकमध्ये २० जणांचा मृत्यू झाला. हुथी बंडखोरांना पाठिंबा देऊ नका, असा इशारा ट्रम्प यांनी इराणला दिला. अमेरिकेच्या हल्ल्यानंतर हुथी बंडखोरांनीही प्रत्युत्तर देण्याची घोषणा केली आहे.

mika singh says Amitabh Bachchan accepted 50 lakh ring but Shah Rukh Khan gave it back
27 / 31

“मी अमिताभ बच्चन, शाहरुख खानला प्रत्येकी ५० लाखांची अंगठी दिली अन्…”

बॉलीवूडमधील लोकप्रिय गायक मिका सिंगने शाहरुख खान, अमिताभ बच्चन आणि गुरदास मान यांना प्रत्येकी ५० लाख रुपयांच्या अंगठ्या भेट दिल्या. शाहरुखने अंगठी परत करण्याचा प्रयत्न केला, पण मिकाने नकार दिला. मिका सलमान खान, शाहरुख खान आणि अमिताभ बच्चन यांच्याशी संवाद साधण्यास कृतज्ञ आहे. त्याने अमिताभ बच्चन आणि हिमेश रेशमियाचं कौतुक केलं. करिअरच्या सुरुवातीला मिकाला संघर्ष करावा लागला, पण दलेर मेहंदीला भेटल्यावर त्याची परिस्थिती बदलली.

Fastag Mandatory Mumbai toll Plaza
28 / 31

फास्टॅग लावा अन्यथा दुप्पट पैसे भरा; मुंबईतील ‘या’ टोलनाक्यांवर फास्टॅग अनिवार्य!

मुंबई March 16, 2025

१ एप्रिल २०२५ पासून सर्व टोल प्लाझावर फास्टॅग अनिवार्य करण्यात आले आहे. फास्टॅग न वापरणाऱ्या वाहनधारकांना दुप्पट शुल्क आकारले जाईल. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) हा निर्णय घेतला आहे. मुंबईतील पाच टोलनाक्यांवर शाळेच्या बस आणि हलक्या वाहनांना टोलमाफी आहे, परंतु वांद्रे-वरळी सी लिंक आणि अटल सेतूवर सर्व वाहनांसाठी फास्टॅग आवश्यक आहे. उच्च न्यायालयाने या निर्णयाला आव्हान देणारी याचिका फेटाळली आहे.

tej pratap holi celebrations
29 / 31

Video: ‘ठुमका लाव नाहीतर निलंबित करतो’, तेजप्रताप यादव यांची होळीच्या दिवशी पोलिसाला धमकी

राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेज प्रताप यादव यांनी धुलिवंदन सण साजरा करताना कार्यकर्त्यांचे कपडे फाडून रंग उधळले आणि पोलिसाला नाचण्यास भाग पाडले. या कृत्यांवर भाजपाने टीका केली आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर जनता दल युनायटेड आणि भाजपाने यादव यांच्यावर टीका करताना बिहारमध्ये जंगलराज असल्याचे म्हटले आहे.

Vadodara Car Crash accused Rakshit Ravish Chaurasia
30 / 31

काल बेदरकार गाडी चालवून महिलेला चिरडलं, आज नीट चालता येईना; कान पकडत मागितली माफी

गुजरातमधील वडोदरा येथे २३ वर्षीय रक्षित चौरसियाने भरधाव वेगाने वाहन चालवत अनेक वाहनांना धडक दिली. या घटनेत एका महिलेचा मृत्यू झाला असून ७ जण जखमी झाले आहेत. आरोपीला स्थानिकांनी ताब्यात घेऊन पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलिसांनी आरोपीवर मोटर वाहन कायद्याखाली गुन्हा दाखल केला आहे.

Chhaava box office collection day 29
31 / 31

Chhaava: ‘छावा’ने मोडला शाहरुखच्या ‘पठाण’चा रेकॉर्ड, २९ दिवसांचे कलेक्शन किती? जाणून घ्या

अभिनेता विकी कौशलच्या 'छावा' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर २९ दिवसांत ५४६ कोटी रुपयांची कमाई केली आहे, ज्याने शाहरुख खानच्या 'पठाण'ला मागे टाकले आहे. लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित हा चित्रपट छत्रपती संभाजी महाराजांवर आधारित आहे. 'छावा'ने पाचव्या गुरुवारी ४ कोटी आणि शुक्रवारी ७.२५ कोटी रुपयांची कमाई केली. वीकेंडला हा चित्रपट ५५० कोटींचा टप्पा पार करेल अशी अपेक्षा आहे.