Chhaava ने गदर २ चा मोडला रेकॉर्ड, रणबीर कपूरच्या ‘ॲनिमल’ला मागे टाकण्यास १६ कोटींची गरज
विकी कौशलच्या 'छावा' चित्रपटाने २७ दिवसांत बॉक्स ऑफिसवर ५३५.५५ कोटींची कमाई केली आहे. चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये सातत्याने घट होत असून बुधवारी ४.७५ कोटी रुपये कमावले. 'छावा'ने 'गदर २', 'सुल्तान', आणि 'संजू'ला मागे टाकले आहे. होळीच्या सुट्टीमुळे कमाईत वाढ होण्याची शक्यता आहे. लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित या चित्रपटात रश्मिका मंदाना, अक्षय खन्ना यांच्याही भूमिका आहेत.