“श्वास घ्यायलाही त्रास, जेवताही यायचं नाही”, ‘धुरंधर २’फेम अभिनेत्याने सांगितला अनुभव
२०२५ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'धुरंधर' चित्रपटातील 'बडे साहब'च्या भूमिकेबद्दल प्रेक्षकांमध्ये खूप कुतूहल होते. 'धुरंधर : द रिव्हेंज'मध्ये दाऊद इब्राहिमच्या भूमिकेत दानिश इक्बाल दिसले. एनडीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीत दानिश यांनी या भूमिकेसाठी ९ तासांचा मेकअप आणि त्यातून आलेल्या थकव्याचा कसा वापर केला, हे सांगितले. शारीरिकदृष्ट्या कमकुवत असतानाही संवाद बोलणे आणि दबदबा टिकवणे हे त्यांच्यासाठी आव्हान होते.