दीपिका पादुकोणचा लाडकी लेक दुआबरोबरचा पहिला व्हिडीओ आला समोर
अभिनेत्री दीपिका पादुकोणने नुकतीच दिलजीत दोसांझच्या कॉन्सर्टमध्ये हजेरी लावली होती. आई झाल्यानंतर ती पहिल्यांदाच सार्वजनिक कार्यक्रमात दिसली. कॉन्सर्टनंतर दीपिका मुंबईला परतली असून, ती तिची लाडकी लेक दुआला घेऊन आली आहे. मुंबईतील खासगी विमानतळावर ती पापाराझींच्या कॅमेऱ्यात कैद झाली. दीपिका व दुआ यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. दीपिका व रणवीर सिंग सहा वर्षांनी आई-बाबा झाले असून, त्यांनी आपल्या मुलीचं नाव दुआ पादुकोण सिंह ठेवलं आहे.