“अती काम करणं…”, ८ तासांच्या कामाच्या मागणीवर दीपिका पादुकोणचं पुन्हा वक्तव्य; म्हणाली…
दीपिका पादुकोणने कामाच्या तासांबद्दल केलेल्या मागणीमुळे चर्चेत आहे. तिने महिलांना भेडसावणाऱ्या अडचणींवर उघडपणे बोलत, नव्यानं आई झालेल्या स्त्रियांना कामावर परतताना मिळणाऱ्या कमी पाठिंब्याबद्दल चिंता व्यक्त केली. दीपिकाने ८ तासांच्या कामाच्या मागणीवर ठाम राहून 'स्पिरिट' चित्रपटातून माघार घेतली. अनेक कलाकारांनी तिच्या मागणीला समर्थन दिलं आहे.