द्वेष आणि हिंसाचाराला प्रोत्साहन…; ‘धुरंधर’वर दिग्दर्शिकेची अप्रत्यक्ष टीका, म्हणाली…
'धुरंधर' चित्रपटाच्या यशानंतर 'धडक २'च्या दिग्दर्शिका शाझिया इक्बालने 'धुरंधर'वर अप्रत्यक्ष टीका केली आहे. इन्स्टाग्रामवर पोस्ट करत तिने 'धुरंधर'ला द्वेष आणि हिंसाचाराला प्रोत्साहन देणारा चित्रपट म्हटले आहे. शाझियाच्या 'धडक २'ला समीक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला, परंतु बॉक्स ऑफिसवर त्याने कमी कमाई केली. 'धुरंधर'ने मात्र जागतिक स्तरावर १४०० कोटी रुपयांहून अधिक कमाई केली आहे.