धर्मेंद्र करायचे फ्लर्ट, जया प्रदा यांनी थेट घेतलेले नाव; राजेश खन्नांबद्दल म्हणालेल्या…
जया प्रदा यांनी बॉलीवूडमधील अनुभव व आठवणी सांगितल्या होत्या. त्यादरम्यान जया प्रदा यांनी ‘बॉलीवूडचे ही-मॅन‘ यांचाही आवर्जून उल्लेख करीत, ते सर्वांत जास्त फ्लर्ट करीत असल्याचे सांगितले होते. कपिलने जया प्रदांना विचारले, “तुमच्याबरोबर सर्वांत जास्त फ्लर्ट कोण करायचं?” त्यावर अभिनेत्री म्हणाल्या, “मी खरंच हे सांगू का?” त्यानंतर त्या हसत म्हणाल्या, “धर्मेंद्र.” त्यानंतर त्यांना सेटवर सर्वांत उशिरा कोण यायचं, असं विचारण्यात आलं. त्यावर जयाप्रदा म्हणाल्या, “राजेश खन्ना खूप उशिरा यायचे. खरंच!”