‘धुरंधर २’ची रेकॉर्डब्रेक कमाई, ७ दिवसांत कमावले १००० कोटी; ‘पुष्पा २’ला टाकलं मागे
रणवीर सिंहच्या 'धुरंधर २' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. १९ मार्चला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने आठवड्याभरात १००० कोटी रुपयांहून अधिक कमाई केली आहे. भारतात ७४५ कोटी आणि परदेशात २६० कोटी रुपयांची कमाई करत 'धुरंधर २'ने 'स्त्री २', 'छावा' आणि 'कांतारा'ला मागे टाकले आहे. रणवीर सिंहसह संजय दत्त, आर. माधवन, अर्जुन रामपाल यांच्या अभिनयाचे सर्वत्र कौतुक होत आहे.