‘धुरंधर २’मधील अर्जुन रामपालची ऋषभ शेट्टीच्या ‘छत्रपती शिवाजी महाराज’ चित्रपटात एन्ट्री
अभिनेता ऋषभ शेट्टी लवकरच 'द प्राईड ऑफ भारत: छत्रपती शिवाजी महाराज' या बिग बजेट चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटात अर्जुन रामपाल खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहेत. संदीप सिंह दिग्दर्शित हा चित्रपट २१ जानेवारी २०२७ रोजी प्रदर्शित होणार आहे. याशिवाय, रितेश देशमुखदेखील 'राजा शिवाजी' या चित्रपटातून शिवाजी महाराजांची कथा प्रेक्षकांसमोर आणणार आहे.