‘सरदारजी ३’च्या ट्रेलरमध्ये पाकिस्तानी हानिया आमिरला पाहून दिलजीत दोसांझवर भडकले नेटकरी
प्रसिद्ध अभिनेता व गायक दिलजीत दोसांझ सध्या ट्रोल होत आहे. त्याने 'सरदारजी ३' या आगामी चित्रपटाचा ट्रेलर शेअर केला आहे, ज्यात पाकिस्तानी अभिनेत्री हानिया आमिर मुख्य भूमिकेत आहे. पहलगाम हल्ल्यानंतर सर्व पाकिस्तानी कलाकारांच्या अकाउंटवर भारतात बंदी आहे. त्यामुळे नेटकरी दिलजीतला ट्रोल करत आहेत. 'सरदारजी ३' २७ जूनला जगभरात प्रदर्शित होणार आहे.