रोहित शेट्टीने खरेदी केली नवीन आलिशान कार, किंमत ऐकून व्हाल थक्क; व्हिडीओ व्हायरल
प्रसिद्ध दिग्दर्शक रोहित शेट्टीने नवीन GMC Hummer EV इलेक्ट्रिक एसयूव्ही कार खरेदी केली आहे, ज्याची किंमत सुमारे ४.५७ कोटी रुपये आहे. रोहितकडे याआधीही अनेक महागड्या गाड्या आहेत. त्याच्या कार कलेक्शनमध्ये Ford Mustang, Range Rover Sport, Mercedes-Benz AMG G63 आणि Lamborghini Urus यांचा समावेश आहे. सध्या रोहित मुंबईचे माजी पोलीस आयुक्त राकेश मारिया यांच्या जीवनावर आधारित चित्रपटावर काम करत आहेत.