बॉलीवूड अभिनेत्री लग्नानंतर ७ महिन्यांनी झाली आई, बाळाचं नाव ठेवलं ‘ऑस्कर’, पाहा Photos
लोकप्रिय बॉलीवूड अभिनेत्री अॅमी जॅक्सन आई झाली आहे. तिने ब्रिटिश अभिनेता एडवर्ड वेस्टविकशी लग्न केल्यानंतर दुसऱ्या मुलाला जन्म दिला आहे. अॅमीने इन्स्टाग्रामवर नवजात बाळाचे फोटो शेअर केले असून त्याचे नाव ऑस्कर अलेक्झांडर वेस्टविक ठेवले आहे. अॅमी व एडवर्ड २०२२ पासून एकत्र आहेत आणि २०२४ मध्ये त्यांनी इटलीत डेस्टिनेशन वेडिंग केले होते.