फिनलँडच्या राष्ट्राध्यक्षांनाही पडली ‘धुरंधर’ची भुरळ, मुलाच्या सांगण्यावरून पाहिला चित्रपट
२०२५ मधील सर्वाधिक चर्चेत असलेला बॉलीवूड सिनेमा 'धुरंधर'ने कोटींची कमाई करत रेकॉर्ड केला. रणवीर सिंह, संजय दत्त, अक्षय खन्ना, आर. माधवन, अर्जुन रामपाल आणि सारा अर्जुन यांच्या प्रमुख भूमिका आहेत. फिनलँडचे राष्ट्राध्यक्ष अलेक्झांडर स्टब यांनी 'धुरंधर' पाहिल्यानंतर भारतातून प्रचंड प्रतिसाद मिळाल्याचे सांगितले. 'धुरंधर'चा सीक्वेल गुढीपाडव्याला प्रदर्शित होणार आहे.