“खूप त्रासदायक…”, गोविंदा-सुनीता यांच्या विभक्त होण्याच्या चर्चांवर लेक टीनाची प्रतिक्रिया
बॉलीवूड अभिनेता गोविंदा आणि सुनीता आहुजा यांच्या नात्याबद्दल अनेक चर्चा सुरू असतात, ज्यामुळे त्यांच्या मुलांना त्रास होतो. मात्र, आता त्यांना याची सवय झाली आहे, असे त्यांच्या मुलगी टीना आहुजाने सांगितले. टीना म्हणाली की, माध्यमांमध्ये दाखवलेल्या गोष्टी नेहमीच सत्य नसतात आणि क्लिकबेटसाठी गोष्टींचा विपर्यास केला जातो. तिने सांगितले की, अशा गोष्टींवर प्रतिक्रिया न देणेच योग्य असते. टीना आणि सुनीता आहुजा 'माँ है ना' शोमध्ये एकत्र दिसल्या आहेत.