‘हनुमान अंश’ सिनेमाबाबत खासदार हेमा मालिनींची प्रतिक्रिया; २१ वर्षीय निर्मातीचे केले कौतुक
हेमा मालिनी म्हणाल्या, “इथे हनुमानजी आणि नीम करोली बाबांचं मंदिर आहे. मी नेहमी इथे येते आणि आज मला खूप आनंद होत आहे की, त्यांच्या जीवनावर आधारित चित्रपट बनवण्यात आला आहे. हा चित्रपट सुपरहिट झाला आहे. हा तर हनुमानजींचाच आशीर्वाद आहे.ज्या मुलीने हा चित्रपट बनवला आहे, ती एक साधी, सामान्य मुलगी आहे. तिला चित्रपट निर्मिती म्हणजे काय, हेही माहीत नाही. पण, तिच्या योगदानामुळे हा चित्रपट इतका चांगला बनला आहे. प्रत्येक जण हा चित्रपट पाहण्यासाठी उत्सुक आहे. मलाही हा चित्रपट पाहायचा आहे.”