२१ वर्षीय तरुणीने बनवला ‘हनुमान अंश’; कोण आहे अनुप्रिया नागर?
'हनुमान अंश'च्या निर्मात्या अनुप्रिया नागर यांची निर्माती म्हणून ही पहिलीच वेळ असून, त्या केवळ २१ वर्षांच्या आहेत. अवघ्या कमी वयामध्ये आध्यात्मिक गुरू नीम करोली बाबा यांच्या जीवनावर आधारित सिनेमाची निर्मिती केली. सिनेमा तयार करण्यापूर्वी अनुप्रिया नागर यांनी वृंदावन येथील आध्यात्मिक संत प्रेमानंद महाराज यांची भेट घेत, त्यांचे मार्गदर्शन घेतले होते. त्यांचा मुंबईमध्ये जन्म झाला असून यूकेमधील 'युनिव्हर्सिटी ऑफ बाथ'मध्ये अर्थशास्त्राचे शिक्षण घेतले आहे.