“ते खूप नशीबवान, चांगल्या भूमिका…”, अमिताभ बच्चन यांच्याबद्दल हेमा मालिनींना वाटायचा हेवा
बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या साडेपाच दशकांच्या कारकिर्दीत अनेक हिट चित्रपट दिले आहेत. हेमा मालिनी यांनी 'आप की आदालत'मध्ये अमिताभ बच्चन यांना मिळालेल्या विविध भूमिकांबद्दल नाराजी व्यक्त केली होती. त्या म्हणाल्या की, अमिताभ यांना विविध प्रकारच्या भूमिका मिळतात, पण महिलांना तितक्या संधी मिळत नाहीत. त्यांनी गंमतीत सांगितले की, त्यांना अमिताभ यांचा हेवा वाटतो. दोघांनी 'शोले', 'सत्ते पे सत्ता', 'नसीब' यांसारख्या अनेक चित्रपटात एकत्र काम केले आहे.