अक्षय कुमारला व्याजासहित पैसे परत केल्यानंतर परेश रावल यांचं ‘ते’ ट्विट चर्चेत, म्हणाले…
'हेरा फेरी ३' चित्रपटाच्या घोषणेनंतर चर्चेत असलेल्या परेश रावल यांनी चित्रपटातून बाहेर पडल्याने वाद निर्माण झाला आहे. अक्षय कुमारच्या प्रोडक्शन हाऊसने त्यांना २५ कोटी रुपयांचा दंड ठोठावला होता, जो परेश यांनी १५ टक्के व्याजासह परत केला. आता परेश यांनी नवीन ट्विटद्वारे त्यांच्या वकिलांनी योग्य उत्तर दिल्याचे सांगितलं आहे. या ट्विटद्वारे त्यांनी "माझे वकील अमित नाईक यांनी माझ्या चित्रपटातून बाहेर पडण्याबाबत योग्य ते उत्तर पाठवले आहे. एकदा त्यांनी माझे उत्तर वाचले की, सर्व समस्या सुटतील" असं म्हटलं आहे.