परेश रावल यांनी अक्षय कुमारला व्याजासकट पैसे केले परत, ‘ती’ अट नव्हती मान्य, जाणून घ्या…
अक्षय कुमार, सुनील शेट्टी आणि परेश रावल पुन्हा 'हेरा फेरी ३'मध्ये येणार होते, पण परेश रावल यांनी चित्रपटातून बाहेर पडण्याची घोषणा केली आणि चाहत्यांमध्ये नाराजी निर्माण झाली. यानंतर अक्षय कुमारकडून परेश यांना २५ कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. हा दंड त्यांनी व्याजासह परत केला आहे. चित्रपटातून बाहेर पडल्याबद्दल त्यांनी १५% वार्षिक व्याज आणि काही अतिरिक्त रक्कम भरपाई म्हणून परत केली आहे. दरम्यान, परेश आणि त्यांच्या टीमने अद्याप यावर कोणतेही निवेदन जारी केलेले नाही.