‘हेरा फेरी ३’ला पुन्हा ब्रेक, लेखकाने अर्ध्यावर सोडला चित्रपट; म्हणाला, “अक्षय कुमार…”
'हेरा फेरी ३' चित्रपटाच्या लेखक रोहन शंकर यांनी कायदेशीर अडचणींमुळे प्रोजेक्टमधून माघार घेतली आहे. शंकर यांनी सांगितले की, भविष्यात प्रियदर्शन दिग्दर्शन करणार असतील तर ते पुन्हा जोडले जाऊ शकतात. चित्रपटाच्या हक्कांवरून वाद निर्माण झाल्याने प्रोजेक्ट अडकला आहे. निर्माता फिरोज नाडियाडवाला यांच्याकडे 'हेरा फेरी' फ्रँचायझीचे पूर्ण हक्क नसल्याचा दावा 'सेव्हन आर्ट्स इंटरनॅशनल'चे जी.पी. विजयकुमार यांनी केला आहे.