“नाव कमावणं…”, हिमांशू मल्होत्राचं इरफान खान यांच्या मुलाबद्दल वक्तव्य; म्हणाला…
अभिनेता हिमांशू मल्होत्राने दिवंगत अभिनेते इरफान खान यांच्या कामाचं कौतुक केलं आहे. इरफान यांच्या सहज सुंदर अभिनयाने अनेकांच्या मनात घर केलं आहे. हिमांशूने इरफान यांचा मुलगा बाबीलबद्दल बोलताना सांगितलं की, बाबीलला इरफानसारखं यश मिळवण्यासाठी खूप मेहनत करावी लागेल. बाबील 'लॉगआउट' चित्रपटात आणि 'द रेलवे मेन' सीरिजमध्ये झळकला होता.