हृतिक रोशनचं बहीण सुनैना रोशनबरोबर झालं होतं मोठं भांडण, म्हणाली, “त्याने मला…”
बॉलीवूड अभिनेता हृतिक रोशनची बहीण सुनैना रोशन हिने 'गलाटा इंडिया'ला दिलेल्या मुलाखतीत तिच्या दारूच्या व्यसनाबद्दल आणि हृतिकसोबत झालेल्या भांडणाबद्दल सांगितले. सुनैना दारूच्या आहारी गेली होती आणि त्यातून बाहेर येण्यासाठी तिला परदेशात कोर्स करावा लागला. हृतिकने तिला कोर्स पूर्ण करण्याची सक्ती केली. कोर्सदरम्यान वडिलांना कर्करोगाचे निदान झाले होते, हे तिला परतल्यावर समजले.