आदिनाथ कोठारे ‘नई नवेली’मध्ये यामी गौतमबरोबर झळकणार; म्हणाला, “प्रचंड राग…”
मराठी अभिनेता आदिनाथ कोठारे लवकरच राष्ट्रीय पुरस्कार विजेती अभिनेत्री यामी गौतमसोबत 'नई नवेली' या चित्रपटात मुख्य भूमिकेत झळकणार आहे. यात तो यामीच्या पतीची म्हणजेच 'राजा'ची भूमिका साकारत आहे. आदिनाथने सांगितले की, राजा मोहिनीच्या प्रेमात पडतो आणि तिच्यावर निस्सीम प्रेम करतो. मात्र, त्याचा भाऊ बंटू मोहिनीला 'डायन' म्हणतो. कथा पुढे जाताना नात्यातील बदल आणि अनपेक्षित वळणं प्रेक्षकांना पाहायला मिळतील. 'नई नवेली' १६ ऑक्टोबर २०२६ रोजी रिलीज होणार आहे.