बोल्ड कंटेंटमुळे प्रदर्शित होऊ न शकलेला भारतीय चित्रपट; नेटफ्लिक्सवर उपलब्ध आहे, पण…
'अनफ्रीडम' हा २०१५ सालचा वादग्रस्त चित्रपट भारतात प्रदर्शित होऊ शकला नाही. राज अमित कुमार दिग्दर्शित या चित्रपटात दहशतवाद, धार्मिक कट्टरता, समलैंगिक संबंध आणि वैयक्तिक स्वातंत्र्य यांसारखे संवेदनशील मुद्दे मांडले आहेत. सेन्सॉर बोर्डाने चित्रपटातील अनेक भागांवर आक्षेप घेतल्याने आणि निर्मात्यांनी बदल करण्यास नकार दिल्याने चित्रपटावर बंदी घालण्यात आली. मात्र, 'अनफ्रीडम' परदेशात प्रदर्शित झाला आणि नेटफ्लिक्सवर ठराविक देशांमध्ये उपलब्ध आहे.