तब्बल ७ वर्षांनंतर सेन्सॉर बोर्डाची नवी कार्यकारिणी जाहीर; वाचा १८ सदस्यांची यादी
केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने ७ वर्षांनंतर केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाची (सेन्सॉर बोर्ड) नवी कार्यकारिणी जाहीर केली आहे. शशी शेखर वेम्पती यांच्या अध्यक्षतेखालील १८ सदस्यांच्या या टीममध्ये पंकज त्रिपाठी, प्रीती झिंटा, सुनील शेट्टी, निशिगंधा वाड, वामन केंद्रे यांचा समावेश आहे. नव्या कार्यकारिणीत विवेक अग्निहोत्री यांच्या पत्नी पल्लवी जोशी यांनाही स्थान मिळाले आहे. कार्यकाळ तीन वर्षांचा असेल.