ऑर्थोपेडिक सर्जन ते गायक-अभिनेता! ‘धूम पिचक धूम’चा गायक आता कुठे आहे? वाचा…
९० च्या दशकात बॉलीवूड संगीताच्या वर्चस्वात, ऑर्थोपेडिक सर्जन डॉ. पलाश सेन यांनी 'युफोरिया' या पहिल्या हिंदी रॉक बँडद्वारे इंडियन पॉप-रॉक संगीताला नवी ओळख दिली. 'माई री', 'महफूज', 'धूम पिचक धूम' यांसारखी गाणी देणारे पलाश बॉलीवूडच्या राजकारणामुळे इंडस्ट्रीपासून दूर झाले. गायक, गीतकार, संगीतकार, डॉक्टर, दिग्दर्शक आणि अभिनेता अशा बहुआयामी व्यक्तिमत्त्वाचे धनी पलाश सध्या डॉक्टर म्हणून कार्यरत आहेत.