“कोणाला मूर्खात काढताय?” गोविंदा-कोमल राणीवर भडकली अभिनेत्री
अभिनेता गोविंदा आणि त्याची पत्नी सुनीता आहुजा यांच्या वैयक्तिक आयुष्यातील वाद सोशल मीडियावर चर्चेत आहेत. गोविंदाचं नाव सह-कलाकार कोमल राणी स्वर्णकार हिच्याशी जोडलं जातंय. अभिनेत्री दिव्या खोसला हिने सुनीताला पाठिंबा दिला असून, कोमलच्या कपाळावरील कुंकवावर प्रश्न उपस्थित केला आहे. गोविंदाने कोमलबरोबर लालबागच्या राजाच्या दर्शनाला गेल्याचं सांगितलं, तर कोमलने सुनीतावर गोविंदाला मारण्याचा प्रयत्न केल्याचे आरोप केले आहेत.