‘दृश्यम ३’ची जबरदस्त ओपनिंग! पहिल्याच दिवशी कमावले तब्बल ‘इतके’ कोटी
अजय देवगणच्या 'दृश्यम: द कन्क्लुजन' या चित्रपटाने पहिल्याच दिवशी ५६.०४ कोटी रुपयांचे बंपर कलेक्शन केले आहे. हा अजयच्या करिअरमधील पहिल्या दिवशी सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. 'सिंघम अगेन'चा रेकॉर्ड मोडत, दृश्यम ३ ला प्रेक्षकांचा आणि समीक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. चित्रपटाचे बजेट ११० ते १३० कोटी आहे आणि हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर ५०० कोटींपेक्षा जास्त कमाई करेल अशी अपेक्षा आहे.