आमच्या मुलाचे नाव ‘वेद’! ४२ वर्षांच्या अभिनेत्रीने जाहीर केलं सव्वा महिन्याच्या बाळाचं नाव
लोकप्रिय अभिनेत्री करिश्मा तन्ना ४२ व्या वर्षी आई झाली आहे. करिश्मा आणि तिचा पती वरुण बंगेरा यांनी आपल्या पहिल्या मुलाचं नाव 'वेद' ठेवलं आहे. जन्माष्टमीच्या दिवशी त्यांनी हे नाव जाहीर केलं. करिश्मा आणि वरुणने २९ जुलै रोजी मुलाचं स्वागत केलं होतं. करिश्मा तन्ना गेल्या दोन दशकांहून अधिक काळ मनोरंजन सृष्टीत सक्रिय आहे आणि अनेक प्रसिद्ध मालिकांमध्ये काम केलं आहे.