वेदांग रैनाशी ब्रेकअपनंतर पुन्हा प्रेमात पडली खुशी कपूर! एक्स बॉयफ्रेंडलाच करतेय डेट
श्रीदेवी आणि बोनी कपूर यांची धाकटी मुलगी खुशी कपूर तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. 'द आर्चीज' मधील सहकलाकार वेदांग रैना याच्याशी ब्रेकअपनंतर, खुशी आता तिचा बालपणीचा मित्र आणि एक्स बॉयफ्रेंड आकाश मेहताला पुन्हा डेट करत आहे. वेदांगबरोबरच्या ब्रेकअपमुळे तिला त्रास झाला होता, पण आता ती आकाशबरोबर आनंदी आहे. खुशीच्या अनेक मित्र-परिवाराने आकाशला इन्स्टाग्रामवर फॉलो केले आहे.