Komal Rani Swarnakar first reastion on affair with Govinda
1 / 31

“स्वतःच्या पतीला मारण्याचा…”, गोविंदाबरोबरच्या नात्यावर कोमल राणीची पहिली प्रतिक्रिया

बॉलीवूड September 26, 2026
This is an AI assisted summary.

बॉलीवूड अभिनेता गोविंदा आणि त्यांची पत्नी सुनीता आहुजा यांच्यातील वादावर कोमल राणी स्वर्णकारने तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. कोमलने सुनीता आहुजांवर गोविंदाला मारण्याचा आणि मानसिक त्रास देण्याचा आरोप केला आहे. तिने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत सुनीता आहुजांना सुनावलं की, "अशा महिलांचा तळतळाट कोणालाही लागत नाही." तसेच, तिच्या नावाचा वापर थांबवण्याची विनंती केली आहे.

Swipe up for next shorts
Omar Abdullah Nidhi Razdan Marriage photo | Jammu Kashmir CM Wedding News updates
2 / 31

जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला पुन्हा अडकले विवाह बंधनात; कोण आहेत निधी राजदान?

देश-विदेश 37 min ago
This is an AI assisted summary.

जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला आणि माजी पत्रकार निधी राजदान यांनी आपल्या नात्याची जाहीर कबुली दिली आहे. ओमर अब्दुल्ला यांनी एक्सवर निधी यांच्याबरोबरचा फोटो शेअर करत, “काल एका नव्या प्रवासाची सुरुवात झाली,” असे लिहिले. हे फोटो लग्नानंतरचे की साखरपुड्यानंतरचे, हे स्पष्ट झालेले नाही.

Swipe up for next shorts
Liu Pengli History
3 / 31

२००० वर्षांपूर्वी चीनमध्ये दहशत निर्माण करणारा लिऊ पेंगली कोण होता?

लोकसत्ता विश्लेषण 2 hr ago
This is an AI assisted summary.

मानवी इतिहासाचा अभ्यास करताना आपल्याला एका बाजूला ज्ञान, विज्ञान, कला, साहित्य आणि संस्कृतीच्या विकासाच्या पाऊलखुणा दिसतात; तर दुसऱ्या बाजूला सत्ता, हिंसा, क्रौर्य आणि मानवी मनातील विकृत प्रवृत्तींचे भयावह दर्शन घडते. इतिहासातील अनेक राजे आणि सत्ताधीशांनी आपल्या महत्त्वाकांक्षेसाठी युद्धे केली, हजारो लोकांचा बळी घेतला आणि संपूर्ण प्रदेश उद्ध्वस्त केले. मात्र, सत्तेचा वापर करून केवळ लूटमार करण्यासाठी किंवा विकृत आनंद मिळवण्यासाठी सामान्य नागरिकांच्या हत्या करणाऱ्या व्यक्तींचे मानसशास्त्र अधिक गुंतागुंतीचे आहे.

Swipe up for next shorts
4 / 31

खिळ्यांनी भरलेली लोखंडी पेटी अन् मृत्यूच्या यातना! ‘आयर्न मेडन’चा इतिहास नेमका काय सांगतो?

लोकसत्ता विश्लेषण 3 hr ago
This is an AI assisted summary.

मानवी इतिहासात मृत्युदंड देण्यासाठी वापरल्या गेलेल्या विविध पद्धतींचा विचार केला, तर माणसाच्या कल्पकतेचा आणि क्रौर्याचा एक अस्वस्थ करणारा पैलू समोर येतो. सुळावर चढवणे, फासावर लटकवणे, शिरच्छेद करणे आणि जाळून मारणे अशा पद्धतींबरोबरच गुन्हेगारांना यातना देण्यासाठी अनेक प्रकारची साधने वापरल्याचे ऐतिहासिक उल्लेख आढळतात. अशाच साधनांपैकी एक म्हणून ‘आयर्न मेडन’ (Iron Maiden) म्हणजेच खिळ्यांची पेटी प्रसिद्ध आहे.

Diljit Dosanjh performing live at Delhi concert | Abhijeet Deepke apology post for Diljit Dosanjh
5 / 31

‘पंजाबी लोकांना लढायला शिकवू नका’, दिलजीत दोसांझचा सीजेपीला टोला

मनोरंजन 5 hr ago
This is an AI assisted summary.

दिल्लीतील कॉन्सर्टमध्ये दिलजीत दोसांझने नीट पेपरफुटी आंदोलनाबाबतच्या भूमिकेवर आणि ‘सतलज’ चित्रपटावरील टीकेला उत्तर दिले. “पंजाबी लोकांना कसे लढायचे हे शिकवू नका,” असे सांगत त्याने चित्रपटासाठी दीर्घ कायदेशीर लढा दिल्याचे नमूद केले.

India Alliance Ramlila Maidan Rally security arrangements by Delhi Police | AI CCTV surveillance at opposition protest rally Ramlila Maidan
6 / 31

रामलीला मैदानावरील ‘इंडिया’ आघाडीच्या मोर्चावर दिल्ली पोलिसांची AI द्वारे नजर

देश-विदेश 6 hr ago
This is an AI assisted summary.

‘इंडिया’ आघाडीच्या १ नोव्हेंबरच्या रामलीला मैदानावरील सभेसाठी दिल्ली पोलिसांनी कडेकोट, तंत्रज्ञानाधारित सुरक्षा व्यवस्था केली आहे. मतदारयादींच्या विशेष सखोल पुनरीक्षणातील कथित अनियमितता आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी सभा होणार आहे.

sumukhi-suresh-mumbai-struggle-netflix-hormonal-standup-show-marathi-news
7 / 31

“५० हजार घेऊन मुंबईला आले, मला वाटलं ३-४ महिने आरामात निघतील पण…”

ओटीटी 6 hr ago
This is an AI assisted summary.

सुमुखी सुरेशच्या ‘होमोनल’ या नेटफ्लिक्सवरील स्टँड-अप शोमध्ये तिच्या संघर्षांवर, नात्यांवर आणि कुटुंबावरील भाष्य आहे. दहा वर्षांहून अधिक काळ कॉर्पोरेट नोकरी केल्यानंतर तिने कॉमेडीला संधी देण्यासाठी नोकरी सोडली आणि ५० हजार रुपये घेऊन मुंबईत आली.

supriya-pathak-pankaj-kapur-love-story-shahid-kapur-dina-pathak-divorce
8 / 31

सुप्रिया पाठक यांची आई शेवटच्या क्षणापर्यंत ‘तो तुला सोडून जाईल’, असं का म्हणत होती?

बॉलीवूड 8 hr ago
This is an AI assisted summary.

ज्येष्ठ अभिनेत्री सुप्रिया पाठक यांचे पहिले लग्न वयाच्या २२व्या वर्षी झाले, मात्र वर्षभरात त्यांचा घटस्फोट झाला. १९८६मध्ये ‘अगला मौसम’च्या चित्रीकरणादरम्यान त्यांची पंकज कपूर यांच्याशी भेट झाली. दोन वर्षांच्या प्रेमसंबंधांनंतर त्यांनी १९८८मध्ये लग्न केले. आई दिना पाठक यांनी या लग्नाला विरोध केला होता.

Rigveda Women Rishis Devdutt Pattanaik
9 / 31

ऋग्वेदात खरोखरच ३० स्त्री ऋषी होत्या? देवदत्त पट्टनायक यांनी उलगडले ऐतिहासिक सत्य!

लोकसत्ता विश्लेषण 10 hr ago
This is an AI assisted summary.

ऋग्वेदामध्ये ३० स्त्री ऋषी (ऋषिका) होत्या आणि त्यांनीच सूक्तांची रचना केली होती, असा दावा नेहमी केला जातो. प्रसिद्ध पौराणिक अभ्यासक देवदत्त पट्टनायक यांच्या मते, ऋग्वेदात शक्तिशाली 'स्त्री-आवाज' असणे आणि 'स्त्री-लेखक' असणे या दोन पूर्णपणे वेगळ्या गोष्टी आहेत. कात्यायनाच्या सर्वानुक्रमणीतील वर्गीकरण, पात्रांचे मानवीकरण आणि पुरुष पुरोहितांचे वर्चस्व या पार्श्वभूमीवर वैदिक काळातील स्त्रियांच्या रचनाकार असण्यामागील ऐतिहासिक सत्य आणि समज-गैरसमज या लेखात सविस्तर जाणून घ्या.

ISRO NVS 03 Launch Satellite for NavIC GPS Boost | GSLV Rocket Launching ISRO NVS 03 Navigation Satellite | इस्रो NVS-03 नेव्हिगेशन उपग्रह प्रक्षेपण NavIC GPS | भारताची स्वदेशी GPS प्रणाली NavIC NVS-03 सॅटेलाइट
10 / 31

इस्रोची मोठी झेप! भारताचं ‘स्वदेशी GPS’ लॉन्च, NVS-03 सॅटेलाइटचं यशस्वी प्रक्षेपण

देश-विदेश 9 hr ago
This is an AI assisted summary.

इस्रोने शुक्रवारी रात्री ११:५१ वाजता श्रीहरिकोटा येथून GSLV-F18 द्वारे NVS-03 उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केले. सुमारे २० मिनिटांत उपग्रह नियोजित कक्षेत पोहोचला. GSLVची ही २० वी भरारी असून, २,२५० किलो वजनाचा उपग्रह जिओसिंक्रोनस ट्रान्सफर ऑर्बिटमध्ये (GTO) पोहचवला.

hibiscus-natural-hair-conditioner-shweta-khairnar-remedy
11 / 31

महागड्या प्रॉडक्ट्सना द्या सुट्टी! जास्वंदाच्या फुलांपासून घरीच बनवा नॅचरल हेअर कंडिशनर

लाइफस्टाइल 18 hr ago
This is an AI assisted summary.

बाजारातील महागडे कंडीशनर अपेक्षित परिणाम देत नसल्यास जास्वंदीच्या फुलांपासून घरच्या घरी नैसर्गिक कंडीशनर बनवता येते. डिजिटल क्रिएटर श्वेता खैरनार यांनी याची कृती शेअर केली आहे. २० जास्वंदीची फुले, अर्धा कप जवसाच्या बिया, पाणी आणि भिजवलेला डिंक लागेल.

Serial Killer Psychology History
12 / 31

सामान्य दिसणारा माणूस ‘सीरियल किलर’ का बनतो? काय सांगतो इतिहास आणि मानसशास्त्र?

लोकसत्ता विश्लेषण 18 hr ago
This is an AI assisted summary.

मानवी इतिहासाला व्यापक स्वरुपाची हिंसा,व्यक्ती केंद्री हत्या आणि माणुसकीला आव्हान देणाऱ्या क्रूरतेच्या घटना नव्या नाहीत. सत्ता, संपत्ती, सूड, राजकीय महत्त्वाकांक्षा आणि वैयक्तिक वैर यांसारख्या अनेक कारणांमुळे आजवर एका माणसाने दुसऱ्या माणसाचा जीव घेतला आहे. मात्र, एखादी व्यक्ती वेगवेगळ्या घटनांमध्ये अनेक लोकांची हत्या करते, तेव्हा या घटनांकडे केवळ गुन्हेगारीच्या दृष्टिकोनातून पाहून चालत नाही. अशा गुन्ह्यांमागील मानसिक प्रक्रिया समजून घेणं आवश्यक ठरतं.

Green Tea vs Black Tea Benefits
13 / 31

दुधाचा चहा की ग्रीन टी? वजन कमी करण्यापासून प्रतिकारशक्तीपर्यंत काय सांगतेय नवं संशोधन?

लोकसत्ता विश्लेषण 8 hr ago
This is an AI assisted summary.

अनेकांसाठी चहा ही दिवसाची सुरुवात आहे. दिवसाच्या शेवटाचाही तो काहींचा सोबती आहे. कित्येकांसाठी चहा एक बेलगाम तल्लफ आहे. तो वाटाघाटीतला साक्षीदार आहे. आता तर तो राष्ट्रीय चर्चेचा केंद्रबिंदूही आहे. इतकंच कशाला, ' टिकली नाही तर स्त्रीच्या कपाळाला शोभा नाही, चहा घेत नाही तो पत्रकार नाही', असं गमती-गमतीत म्हणण्या इतपत वसाहतवादी ब्रिटिशांनी ईस्ट इंडिया कंपनीच्या माध्यमातून कधीकाळी इंट्रोड्युस केलेला चहा इथल्या संस्कृतीत, इथल्या समाजजीवनात आता पक्का मुरला आहे.

Biren Singh Manipur Allegation political news updates | BJP Congress Handshake Biren Singh controversy details
14 / 31

‘भाजपा नेत्यांनीच काँग्रेसशी हातमिळवणी करून मला हटवले’, माजी मुख्यमंत्र्यांचा आरोप

देश-विदेश 21 hr ago
This is an AI assisted summary.

मणिपूरचे माजी मुख्यमंत्री बिरेन सिंह यांनी भाजपाच्या राज्यातील काही नेत्यांवर काँग्रेसशी हातमिळवणी करून आपल्याला पदावरून हटवण्याचा कट रचल्याचा आरोप केला. केंद्रीय नेतृत्वाला त्यांनी दोष दिला नाही. काँग्रेसमधून भाजपात आल्यानंतर दोनदा मुख्यमंत्री झाल्याचे काही आमदारांना मान्य नव्हते, असे ते म्हणाले.

Warm and comforting winter carbohydrate-rich food dishes served on a table during cold weather
15 / 31

थंडी पडताच गरमागरम पदार्थ का खावेसे वाटतात? खासकरुन कर्बोदकं खाण्याची इच्छा का वाढते?

लोकसत्ता विश्लेषण 22 hr ago
This is an AI assisted summary.

हिवाळ्यात गरम, पोटभरीचे आणि कर्बोदकयुक्त पदार्थ खावेसे वाटणे सामान्य आहे. थंडीपासून मिळणारा दिलासा, बालपणीच्या आठवणी, खाद्यसंस्कृती आणि ऋतूबदलाचा खाण्यापिण्याच्या सवयींवर प्रभाव पडतो. थंडीत शरीराला अधिक ऊर्जा लागू शकते; त्यामुळे कर्बोदकांची गरज भासते. गरम पदार्थांमधून मिळणाऱ्या आरामामुळे आपल्याला विशिष्ट पदार्थ खावेसे वाटू शकतात.

Does Phone Listen To Conversations
16 / 31

गुगलसर्च ते सोशल मीडिया तुमच्या आवडीनिवडीचा माग कसा घेतला जातो?

लोकसत्ता विश्लेषण October 30, 2026
This is an AI assisted summary.

कधी असा अनुभव आला आहे का? की, एखाद्या मित्राशी आपण नवीन कार घेण्याबद्दल बोलतो. काही वेळाने मोबाईल उघडल्यावर त्याच कारची जाहिरात इन्स्टाग्रामवर दिसू लागते. एखाद्या हॉटेलमध्ये जाण्याचा विचार करतो आणि काही वेळात त्या परिसरातील हॉटेल्सच्या जाहिराती दिसतात. ऑनलाइन एखाद्या वस्तूची किंमत तपासतो आणि पुढील काही दिवस वेगवेगळ्या संकेतस्थळांवर त्याच वस्तूच्या जाहिराती दिसत राहतात. मग सहज प्रश्न पडतो, आपण मोबाईलवर काहीही टाइप केलेले नसताना त्याला आपल्या मनात काय चालले आहे, हे कसे कळते? मोबाईल आपले संभाषण ऐकतो का?

shraddha-kapoor-eetha-movie-trailer-review-netizens-reaction
17 / 31

‘ईठा’चा ट्रेलर प्रेक्षकांना कसा वाटला? म्हणाले, “श्रद्धा कपूरच्या करिअरमधील सर्वात…”

बॉलीवूड October 30, 2026
This is an AI assisted summary.

श्रद्धा कपूरच्या बहुप्रतीक्षित ‘ईठा’ चित्रपटाचा तीन मिनिटे दोन सेकंदांचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून तो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित हा चित्रपट तमाशा सम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर यांच्या संघर्षावर आधारित आहे. श्रद्धाचा अभिनय, दमदार संवाद आणि अजय-अतुलचे संगीत याचं कौतुक होतं आहे.

Anjir Fruit Health Benefits
18 / 31

चवीला गोड असणारे ‘अंजीर’ खरंच फळ आहे का? काय सांगते विज्ञान?

लोकसत्ता विश्लेषण 8 hr ago
This is an AI assisted summary.

मानवी आहारात फळांना प्राचीन काळापासून महत्त्वाचं स्थान आहे. शेतीचा शोध लागण्यापूर्वी मानव शिकारी-संचयी जीवनशैली (Hunting -Gathering) जगत होता. प्राण्यांची शिकार करुन तसंच निसर्गात उपलब्ध असलेली फळं, कंदमुळं, बिया आणि इतर वनस्पतीजन्य पदार्थ गोळा करून त्यांचा अन्न म्हणून वापर करत होता. सुमारे १० हजार ते १२ हजार वर्षांपूर्वी नव-पाषाणयुगात शेतीची सुरुवात झाली..

Digital Footprint Meaning Types
19 / 31

डिजिटल फूटप्रिंट म्हणजे काय? सायबर फ्रॉडपासून वाचण्यासाठी जाणून घ्या ८ उपाय

लोकसत्ता विश्लेषण 23 hr ago
This is an AI assisted summary.

आजच्या डिजिटल युगात आपण इंटरनेटवर जे काही करतो, त्याची कुठे ना कुठे नोंद होत असते. गुगलवर केलेले सर्च, सोशल मीडियावर पोस्ट केलेला फोटो, ऑनलाइन खरेदी, एखाद्या संकेतस्थळाला दिलेली माहिती, मोबाईलमधील लोकेशन, ऑनलाइन पेमेंट किंवा पाठवलेला ई-मेल… या प्रत्येक कृतीतून आपल्या डिजिटल अस्तित्वाची एक खूण मागे राहते. या खुणांच्या एकत्रित स्वरूपाला डिजिटल फूटप्रिंट (Digital Footprint) असे म्हणतात.

करीना कपूरच्या शोमध्ये पोहोचली शाहीद कपूरची पत्नी मीरा
20 / 31

शाहीद कपूरची एक्स करीना कपूरने त्याच्या बायकोला तिसऱ्या बाळाबद्दल विचारलं, मीरा म्हणाली…

बॉलीवूड October 30, 2026
This is an AI assisted summary.

करीना कपूरच्या ‘व्हॉट वूमन वॉन्ट’ या टॉक शोमध्ये शाहीद कपूरची पत्नी मीरा राजपूत पाहुणी म्हणून सहभागी झाली आहे. दोघींचा संवाद असलेला प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल झाला. करीना-मीराच्या एकत्र येण्याबाबत चाहत्यांनी आश्चर्य व्यक्त केले. तिसऱ्या बाळाच्या अफवेबद्दल विचारल्यावर मीराने काय उत्तर दिलं, ते वाचा...

Kalmegh Plant Benefits Andrographis Paniculata Ayurvedic Uses
21 / 31

दारात सहज दिसणारा ‘कडूचिरायता’ आरोग्यासाठी खरंच फायदेशीर आहे का?

लोकसत्ता विश्लेषण October 30, 2026
This is an AI assisted summary.

आपण राहतो त्या परिसरात अनेक औषधी वनस्पती आढळतात. काही वनस्पतींची ओळख त्यांच्या विशिष्ट गंधामुळे, तर काहींची चवीमुळे वेगळी ओळख निर्माण झालेली असते. मात्र,या ओळखीवरुन अंगभूत गुणांची पारख होतेच असं नाही. कालमेघ ही अशीच एक वनस्पती. चवीला अत्यंत कडू. कडूचिरायता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या वनस्पतीला संस्कृतमध्ये भूनिंब असंही म्हणतात. या कडू भूनिंबाचा शेवटी उपयोग काय, असा प्रश्नही काहींना पडू शकतो.

aamir-khan-gouri-sprat-first-karwa-chauth-sunita-kapoor-celebration
22 / 31

Video: हातात हात अन्… आमिर खानचे तिसऱ्या पत्नीबरोबर करवा चौथ सेलिब्रेशन

बॉलीवूड October 30, 2026
This is an AI assisted summary.

अनिल कपूर यांच्या पत्नी सुनीता कपूर यांनी जुहू येथील घरी आयोजित केलेल्या करवा चौथ कार्यक्रमाला अनेक बॉलीवूड कलाकारांनी हजेरी लावली. यंदाच्या सोहळ्यात आमिर खान आणि गौरी स्प्रॅट ही जोडी विशेष लक्षवेधी ठरली. लग्नानंतरचा पहिलाच करवा चौथ साजरा करण्यासाठी दोघे हातात हात घालून कार्यक्रमात पोहोचले.

jio-hotstar-resort-heart-beat-season-3-ott-trending-south-series
23 / 31

जिओ हॉटस्टारवर ‘या’ सीरिजचा धुमाकूळ! तब्बल १०० मिलियन व्ह्यूज मिळवत रचला विक्रम

ओटीटी October 30, 2026
This is an AI assisted summary.

जिओ हॉटस्टारवरील तमिळ सीरिजना भाषांच्या सीमा ओलांडून प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळत आहे. ‘रिसॉर्ट’ने १०० मिलियन वॉच ऑवर्सचा टप्पा पार करून प्लॅटफॉर्मवरील हा विक्रम करणारी पहिली फिक्शन ओरिजिनल सीरिज ठरली.

rajesh-khanna- Anita-advani-relationship-supreme-court-dismisses-petition-luxury-litigation
24 / 31

राजेश खन्नांबरोबरच्या नात्याला लग्नाचा दर्जा द्या; अभिनेत्रीची याचिका फेटाळली

बॉलीवूड October 30, 2026
This is an AI assisted summary.

राजेश खन्ना यांच्यासोबतच्या लिव्ह-इन नात्याला वैवाहिक दर्जा मिळावा, यासाठी अभिनेत्री अनिता अडवाणीने केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी फेटाळली. याचिका अनावश्यक असल्याचे न्यायालयाने नमूद केले. बॉम्बे उच्च न्यायालयाने एप्रिलमध्ये तिची मागणी नाकारली होती. आता सुप्रीम कोर्टानेही याचिका फेटाळली.

Health tips marathi ayurvedic lifestyle guide | Longevity ayurvedic diet tips in Marathi | आरोग्य टीप्स आयुर्वेदिक जीवनशैली मराठी | दीर्घायुष्यासाठी आयुर्वेदिक आहार नियम
25 / 31

औषधांविना नाबाद १००! निरोगी आयुष्यासाठी वैद्य खडीवाले यांनी सांगितलेले काय खाल, काय टाळाल?

लोकसत्ता विश्लेषण October 30, 2026
This is an AI assisted summary.

Health tips marathi ayurvedic: निरोगी आणि शतायुषी जीवनासाठी औषधांशिवाय आरोग्य जपण्याच्या सोप्या आयुर्वेदिक टिप्स. पन्नाशी-साठीनंतर आरोग्याची काळजी कशी घ्यावी, रात्री उशिरा जेवण टाळणे, आहारातील कुपथ्ये आणि कोणत्या घरगुती पदार्थांचा वापर करावा याविषयी वैद्य प. य. खडीवाले यांनी दिलेला सविस्तर आयुर्वेदिक सल्ला.

arjun-bijlani-luxury-tara-villa-karjat-unseen-photos(1)
26 / 31

अभिनेत्याने कर्जतमध्ये बांधला आलिशान व्हिला, दिलं सासू सासऱ्यांचं नाव; पाहा Inside Photos

टेलीव्हिजन October 30, 2026
This is an AI assisted summary.

अभिनेता अर्जुन बिजलानीने कर्जतमध्ये १२,००० चौरस फुटांचे ‘तारा व्हिला’ हे स्वप्नातील फार्महाऊस उभारले आहे. ग्रीक आणि मेडिटरेनियन शैलीतील या पांढऱ्या व्हिलामध्ये मोठी बाग, स्विमिंग पूल, जॅक्युझी, खासगी टेरेस आणि पार्टीसाठी प्रशस्त लॉ

Drishyam Kamlesh Sawant Ishita Dutta slap incident | Drishyam actor Kamlesh Sawant interview
27 / 31

‘दृश्यम २’च्या रिहर्सलदरम्यान एका चुकीमुळे कमलेश सावंत यांच्यावर संतापला होता दिग्दर्शक

बॉलीवूड October 30, 2026
This is an AI assisted summary.

‘दृष्यम २’च्या शूटिंगदरम्यान कमलेश सावंत यांच्याकडून इशिता दत्ताला चुकून फटका बसला होता. एका दृश्यासाठी रिहर्सल करताना दोघांमध्ये ठरलेलं अंतर प्रत्यक्ष चित्रीकरणावेळी कमी झालं आणि कमलेश यांचा हात इशिताच्या चेहऱ्याला लागला. दिग्दर्शक निशिकांत कामत संतापले होते. पण इशिताने परिस्थिती सावरली.

MNS Chief Raj Thackeray
28 / 31

राज ठाकरेंचं दिलखुलास भाषण; “देवेंद्र फडणवीसांना २०२९ पर्यंत मुख्यमंत्री ठेवा..”

मुंबई 23 hr ago
This is an AI assisted summary.

प्रशांत कुलकर्णी यांच्या ‘हास्यरेषा’ पुस्तकाचे प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमात फडणवीस, उद्धव ठाकरे, राज ठाकरे आणि सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार एकाच मंचावर होते. शेलारांच्या वक्तव्याचा संदर्भ घेत राज ठाकरेंनी मिश्कीलपणे फडणवीस २०२९ पर्यंत मुख्यमंत्री ठेवा म्हणजे झालं. असं राज ठाकरे म्हणाले आणि एकच हशा पिकला.

Madhuri Dixit Dr Shriram Nene marriage secrets | Madhuri Dixit husband Dr Nene statement
29 / 31

माधुरी दीक्षितबरोबरच्या २७ वर्षांच्या संसाराबद्दल श्रीराम नेने म्हणाले, “कठीण काळात…”

बॉलीवूड October 30, 2026
This is an AI assisted summary.

माधुरी दीक्षित आणि डॉ. श्रीराम नेने यांनी १५ ऑक्टोबरला लग्नाचा २७वा वाढदिवस साजरा केला. त्यांच्या सुखी वैवाहिक आयुष्याचं रहस्य सांगताना श्रीराम नेने म्हणाले की, दोघांचे विचार, खाण्याच्या सवयी आणि जीवनशैली बऱ्याच अंशी समान आहेत. त्यांच्या नात्यात निर्णय पुरुषप्रधान पद्धतीने घेतले जात नाही.

Janhvi Kapoor Shikhar Pahariya dating confirmation | Koffee With Karan Janhvi Kapoor marriage updates
30 / 31

जान्हवी कपूरने प्रेमाची कबुली, स्मृती शिंदेंची होणार सून? लग्नाबद्दल म्हणाली…

बॉलीवूड October 30, 2026
This is an AI assisted summary.

जान्हवी कपूरने ‘कॉफी विथ करण’मध्ये शिखर पहारियाला डेट करत असल्याची कबुली दिली. खासगी आयुष्याबद्दल उघडपणे बोलण्याची इच्छा नसल्याने तिने याआधी अधिकृत वक्तव्य केले नव्हते; मात्र नातं लपवणं कंटाळवाणं वाटत असल्याचे ती म्हणाली.

manoj-bajpayee-bollywood-family-myth-statement
31 / 31

“बॉलीवूडला कुटुंब म्हणणं म्हणजे मूर्खपणा”, मनोज बाजपेयी स्पष्टच बोलले

बॉलीवूड October 30, 2026
This is an AI assisted summary.

मनोज बाजपेयी यांनी बॉलीवूडला एक कुटुंब मानण्याची कल्पना भ्रम आणि मूर्खपणा असल्याचे म्हटले आहे. अनेक वर्षे चित्रपटसृष्टीत काम करूनही आपण तिचा भाग असल्याचे कधी जाणवले नाही, असे त्यांनी सांगितले. कलाकारांच्या यशाचे कौतुक करण्यासाठी कोणी फोन करत नाही आणि निर्मिती संस्थांनाही इतरांना अधिक नफा मिळालेला आवडत नाही, असं मनोज बाजपेयींनी सांगितलं.