चहा-कॉफी पिताय? होऊ शकतो अन्ननलिकेचा कॅन्सर; डॉ. नेनेंनी सांगितलं ते वाचून झोप उडेल
बॉलीवूड अभिनेत्री माधुरी दीक्षितचे पती आणि कार्डिओथोरॅसिक सर्जन डॉ. श्रीराम नेने यांनी चहा आणि कॉफीच्या अतिगरम सेवनामुळे अन्ननलिकेचा कर्करोग होण्याचा धोका वाढू शकतो, असा इशारा दिला आहे. 'इंटरनॅशनल जर्नल ऑफ कॅन्सर २०२६' मधील अभ्यासानुसार, अतिगरम पेये पिणाऱ्यांमध्ये हा धोका तीन पटीने जास्त असतो. त्यामुळे चहा-कॉफी कोमट होऊ देऊन पिण्याचा सल्ला त्यांनी दिला आहे.