“माझं माधुरी दीक्षितवर एकतर्फी प्रेम…”, नाना पाटेकरांचा ‘तो’ जुना व्हिडीओ व्हायरल
बॉलीवूडचे ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर आणि अभिनेत्री माधुरी दीक्षित यांनी १९८९ मध्ये आलेल्या 'वजूद' चित्रपटात एकत्र काम केले होते. या चित्रपटातील नाना पाटेकरांनी माधुरीसाठी म्हटलेली "कैसे बताऊँ मैं तुम्हें…" ही शायरी आजही लोकप्रिय आहे. 'आप की अदालत' या शोमध्ये नाना पाटेकरांनी ही शायरी पुन्हा सादर केली होती, ज्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान ट्रेंड होत आहे.