“सामान्य भाविकांना धक्के…”, लालबागमधील परिणीती चोप्राचा व्हिडीओ पाहून नेटकरी भडकले!
गणेशोत्सवानिमित्त अभिनेत्री परिणीती चोप्राने लालबागच्या राजाचे दर्शन घेतले आणि पती राघव चड्ढा यांना व्हिडीओ कॉलवर दर्शन घडवले. परिणीतीला मिळालेल्या व्हीआयपी सुविधांमुळे सोशल मीडियावर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. सामान्य भाविक तासनतास रांगेत उभे असताना, सेलिब्रिटींना थेट दर्शन मिळते. परिणीतीच्या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी 'सेलिब्रिटींचा गणपती' अशी टीका केली आहे.