‘प्रहार: द उज्ज्वल निकम स्टोरी’ची संमिश्र सुरुवात; पहिल्या दिवशी कमावले ‘इतके’ कोटी
राजकुमार रावचा 'प्रहार: द उज्ज्वल निकम स्टोरी' हा कोर्टरूम ड्रामा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. पहिल्या दिवशी या चित्रपटाने जगभरात ३.५२ कोटी रुपयांची कमाई केली आहे. भारतात २.७७ कोटी आणि विदेशात ७५ लाख रुपये कमावले. चित्रपटाचे बजेट ६०-७० कोटी आहे. उज्ज्वल निकम यांच्या जीवनावर आधारित या चित्रपटात राजकुमार राव, वामिका गब्बी, ललित प्रभाकर, जयदीप अहलावत आणि सिकंदर खेर यांच्या भूमिका आहेत.