“फक्त फॉरमॅलिटी…”, आलिया भट्टबद्दल सावत्र भावाचा खुलासा; म्हणाला, “रणबीर कपूरला…”
महेश भट्ट यांचा मुलगा राहुल भट्टने एका मुलाखतीत आपल्या सावत्र बहिणी आलिया भट्ट, शाहीन भट्ट आणि सावत्र आई सोनी राजदान यांच्याबद्दल भाष्य केलं. राहुलने स्पष्ट केलं की, आलियाकडे स्टारडम असलं तरी पूजा भट्ट सर्वात प्रतिभावान आहे. त्याने सांगितलं की, सावत्र बहिणींशी त्याचे आदरयुक्त संबंध आहेत, पण सोनी राजदानबरोबरचं नातं फक्त फॉरमॅलिटी आहे. रणबीर कपूरबद्दलही त्याने सकारात्मक मत व्यक्त केलं.