“मी त्याच्या बरगड्या मोडल्या…”; अभिनेत्रीच्या भावाला रणवीरला मारल्याचा होतोय पश्चात्ताप
अभिनेता रणवीर शौरी आणि पूजा भट्ट २००२ मध्ये लिव्ह इनमध्ये राहत होते. त्यांच्यातील वादामुळे पूजाचा भाऊ राहुल भट्टने रणवीरला मारहाण केली होती, ज्यामुळे राहुलला अटक झाली होती. दोन दशकांनंतर राहुलने पश्चात्ताप व्यक्त केला आहे. त्याने रणवीरच्या समजूतदारपणाचे कौतुक केले आहे, कारण रणवीरने कोर्टातील केस मिटवण्यासाठी पुढाकार घेतला होता.