“मी एका रूममध्ये तिच्या…”, बॉलीवूड अभिनेत्रीने बॉयफ्रेंडशी ब्रेकअप करायला पाठवलं होतं
प्रसिद्ध माजी चित्रपट समीक्षक आणि 'धर्मा कॉर्नरस्टोन एजन्सी'चे सीओओ राजीव मसंद यांनी सायरस ब्रोचा यांच्या टॉक शोमध्ये कलाकारांच्या खासगी आयुष्याबद्दल धक्कादायक खुलासा केला. त्यांनी एका लोकप्रिय अभिनेत्रीच्या वतीने तिच्या बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप केल्याचा किस्सा शेअर केला. मसंद यांनी कलाकारांच्या वैयक्तिक आयुष्य आणि करिअर यातील सीमारेषा कशा पुसट होतात, यावर भाष्य केले. २०२१ मध्ये मसंद यांची 'धर्मा कॉर्नरस्टोन एजन्सी'चे सीओओ म्हणून नियुक्ती झाली होती.